प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरी
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, तुषार देवरे, वैभव सोनवणे यांच्याहस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक श्रावण अहिरे यांनी महात्मा गांधी यांचा जीवनपट उलगडला. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 गुजरात येथील पोरबंदर गावी झाला. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी तसेच कामगारांचे कल्याण करण्यासाठी आपला लढा दिला. वीस वर्षाच्या कालावधीनंतर भारतात आल्यावर त्यांनी 9 जानेवारी 1915 पासून तर 30 जानेवारी 1948 पर्यंत देश स्वातंत्र्यासाठी ते कार्यरत राहिले. त्यांचा पहिला सत्याग्रह म्हणजे 1917, दुसरा सत्याग्रह 1918, खेळा सत्याग्रह तिसरा 1920 ते 1922 पर्यंत त्यांनी असहकार आंदोलन सुरू ठेवले. त्यानंतर 1931 चा संविधान कायदेभंग, 1942 चलेजाव आंदोलन केले.

दुसरे स्वातंत्र्य सैनिक लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. 9 जून इसवी सन 1964 रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या कार्यकाळात इसवी सन 1965 सालचे दुसरे भारत पाकिस्तान युद्ध घडले. सोवियत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तान बरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद येथे दौऱ्यावर असताना 11 जानेवारी इ.स.1966 रोजी त्यांचा मृत्यू झाला, असे अहिरे यांनी सांगितले. याप्रसंगी सुंदर फलक लेखन करण्यात आले .या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post Views: 29