नोटाबंदीच्या विरोधात कॉंग्रेसचा पिंपरीत थाळीनाद
पिंपरी (दि. 09 जानेवारी 2017) सामान्यांचे कष्टाचे पैसे बँकेत भरायला लावून भांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच एकाधिकारशाही प्रध्दतीने नरेंद्र मोदींनी सव्वाशे कोटी जनतेवर नोटाबंदीचा निर्णय लादला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली. सव्वाशे लोकांना जीव गमवावा लागला. गृहीणींनी बचत केलेल्या पैसाचा हिशोब मागणारे सरकार भाजपाच्या पदाधिकारी व मंत्र्यांकडे लाखो रुपयांच्या नोटा सापडून देखिल त्यांच्यावर कारवाई का करीत नाही ? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. 09 जानेवारी) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात नोटीबंदीच्या विरोधात थाळीनाद करण्यात आला.
यावेळी पक्षनिरिक्षक व सरचिटणीस रेणू पाटील, रुपाली कापसे, माजी महापौर कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, एआयसीसीच्या सदस्य निगार बारसकर, सल्लागार शामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, माजी नगरसेवक रामचंद्र माने, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश युवा सरचिटणीस चिंतामणी सोंडकर, चिंचवड विधानसभा युवा अध्यक्ष मयूर जैस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सज्जी वर्की, मॅन्युअल डिसूजा, हिरामण खवळे, उमेश बनसोडे, आशा खवळे, नितीन कांबळे, ॲड. क्षितिज गायकवाड, प्रमिला शेटे, शिवानी भाट, नंदा तुळसे, मृणालिनी सोनवणे, राधिका अडागळे, आशा शहाणे, आशा वाघचौरे, वामन ऐनिले, अनिरुध्द कांबळे, मकर यादव आदींसह शेकडो कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी साठे म्हणाले की, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मेक इन महाराष्ट्र अशी स्वप्न दाखवून पंतप्रधान मोदींनी अडीच वर्षाच्या कार्यकालात अंबानी, अदानी यांच्या भल्यासाठीच निर्णय घेतले. कॉंग्रेस पक्षानी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार यांना केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या. तर भाजपा सरकार भांडवलदारांसाठी योजना राबवित आहे. स्टार्ट अप इंडियाच्या नावाखाली जुन्याच रिलायन्स कंपनीला जीओच्या नावाखाली हजारों कोटींची कर सवलत कशी दिली जाते या प्रश्नाचे व कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी विचारलेल्या पाच प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेच पाहिजे. सत्तेची फळे चाखून जनतेची दिशाभूल करणा-या शिवसेनेला आणि भाजपाला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आता आली आहे. शास्तीकर, अनधिकृत बांधकाम या विषयावर साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करणारे आता कुठे गेले ? निर्णय न घेता जाहीरात बाजी करुन खोटारडा प्रचार करणा-या या बोलबच्चन सरकारचा देशभर कॉंग्रेस आज तीव्र निषेध करत आहे. असे ही साठे म्हणाले.
यावेळी उपस्थित कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आणि भाजप सेनेच्या विरोधात थाळीनाद करुन निषेधाच्या घोषणा दिल्या.
भांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठे






















