प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. अतुल देव व शाळेचे व्यवस्थापक श्री. तुषार देवरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शामल अनिल पाटील या सहावीच्या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे महत्व शिकागो येथे पार पाडलेल्या धर्मपरिषदेत विवेकंदांनी जगाला समजावून संगितले. वेद, उपनिषदे, पुराण यांचा सखोल अभ्यास व धर्म विषयी नितांत आदराची भावना, प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याची जिद्द, एकाग्रता व चिकटी या जोरावर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला मोहिनी घातली होती असे विचार शाळेचे प्राचार्य श्री. अतुल देव यांनी या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले. या प्रसंगी शाळेचे कला शिक्षक श्री. भूपेंद्र साळुंखे व श्री राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रीटिंग कार्ड बनविणे’ स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यानी तयार केलेल्या ग्रीटिंग कार्ड वरुन असे जाणवते की स्वामीजींच्या विचाराचा पगडा विद्यार्थ्यांवर पडला आहे असे गौरवोद्गार संस्थेचेअध्यक्ष्य श्री. प्रशांत पाटील यांनी काढले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. माळीचकर यांनी केले.