प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “ग्रीन डे “उत्साहात साजरा
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने “ग्रीन डे ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते सरस्वती माता, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंतर इ. नर्सरी ते इ. १. ली मधील विद्यार्थ्यांनी “ग्रीन डे” विषयी भाषण करतांना सांगितले की, आपल्या तिरंग्या मधील हिरवा रंग, निसर्गाचा रंग, प्रगती, समृद्धी, भरभराटी, सुसंवाद स्थिरता, संतुलन, सहनशक्ती अंतर्बाह्य सौंदर्य आणि चैतन्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग मानसिक स्वास्थ्य, आर्थिक उन्नती, शांतता समृद्धी याचे महत्व सांगतो. हिरव्या माझ्या विश्वात जे काही आहे. हिरवा रंग प्रेरणा व श्रेष्ठतेने जोडलेला आहे. रंग व त्याचे महत्त्व समजण्यासाठी प्री-प्रायमरी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे ग्रीन डे साजरा केला गेला. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच प्राचार्य वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरव्या रंगाची ओळख चिमुकल्यांना करुन देण्यात आली. चिमुकल्यांनी हिरव्या रंगाच्या विविध प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या होत्या. त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेत सकाळी सगळीकडे हिरवाच- हिरवा रंग दिसत होता. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक -शिक्षिका यांनी ही हिरवा पोशाख परिधान केला. विद्यार्थ्यांनी कोणी पृथ्वी तर कोणी निसर्गातील वृक्ष, फळे, फुले, हिरवे घर-(Green House) सागरी किनार पट्टीचा सुंदर देखावा. जलचर प्राणी यांचे विविध आकार (माँडेल्स) बनवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी “झाडे लावा झाडे जगवा” “निसर्ग सुंदर बनवा.” असा नारा देऊन वृक्ष संवर्धन हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यानंतर ग्रीन डे विषयी “ग्रीन इज लीफ आँन द ट्री “हे सुंदर असे गीत प्रभावती चौधरी यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे संयोजन सुनिता पाटील, सविता लाडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम पवार यांनी केले. वर्ग उपक्रम आणि विद्यार्थी उपक्रम याविषयी काम कांचन अहिरराव, हिरल सोनवणे यांनी पाहिले. कार्यक्रमाची उत्तम सजावट दिपमाला आहिरराव, किरण गवळी यांनी केले.