प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आठवणींना उजाळा
साक्री :- प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथमतः शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे व शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपप्राचार्य घनश्याम सोनवणे व गीतांजली काकुस्ते आणि इ. ७ वी.मधील सिध्दी जाधव व वेदिका तितरे या विदयार्थीनींनी आपल्या भाषणातून असे सांगितले की, आजच्या दिवशी २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधीजींचा जन्म झाला. वकिली करायला आफ्रिकेत गेलेल्या गांधीजींचं जीवन एका घटनेने बदललं ७ जून १८९३ रोजी गांधीजी डरबन होऊन प्रिटोरियाला जात असताना एका गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांना प्रथम श्रेणीच्या रेल्वेच्या डब्यातून फेकून दिले. त्यानंतर गांधीजींनी वर्णभेदा विरोधात लढा उभा केला. भारतातही त्यांनी सत्याग्रह हिंसाच्या मार्गाने ब्रिटिशांच्या विरोधात लढा सुरू केला. १९९९ सालचे त्यांनी असहकार आंदोलन, १९३० सालचे सविनय कायदेभंग आणि १९४२ सालचे चले जावा आंदोलन हे त्यांनी उभारलेल्या आंदोलनातील सर्वात मोठे आंदोलन आणि त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं.आणि भारताला सविनय मार्गाने स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर आजच्या दिवशी भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती आहे.त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेश मधील वाराणसी पासून सात मैल दूर असलेल्या मुघल सराई या लहान गावात झाला. १९३० मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लालबहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांची नेतृत्व केले. सात वर्षे ब्रिटिश तुरुंगवासात घालवली.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर १९५१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील रेल्वेमंत्री, वाहतूक दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री व नेहरूंच्या आजारपणात बिन खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमावा लागल्यामुळे त्यांनी स्वतःला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि १९६४ साली नेहरूंच्या मृत्यूनंतर ते भारताचे पंतप्रधान झाले आणि लालबहादूर शास्त्री साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. १९६५ च्या युद्धात त्यांनी “जय जवान जय किसान” हा नारा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला या युद्धात पराभूत केले.असे मनोगत त्यांनी आपल्या विचारातून व्यक्त केले.त्यानंतर इ.६ वी- ब मधील विद्यार्थ्यांनी “प्लास्टिक मुक्त भारत” या विषयावर आधारित बॅनर बनवून “स्वच्छ भारत, सुंदर भारत ” एकच निर्धार करूया,प्लास्टिकचा वापर टाळूया “अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी “भारत स्वच्छता अभियानाचा ” अनमोल संदेश दिला. त्यानंतर महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत इ. नर्सरी ते इ. ४ थी मधील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतून व इ. ५ वी. ते इ. १० वी.तील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी इंग्रजी भाषेतून आपल्या वक्तव्यातून विविध कथा सादर केल्या. व शेवटी राष्ट्रगीत गाऊन भारतमाता की जय, महात्मा गांधी की जय, लाल बहादूरशास्त्री की जय या घोषणा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संयोजन जयेश बागले यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ. ७ वी.मधील विद्यार्थ्यांनी तनिष्का जैन व कृतिका नेरे यांनी केले. संयोजन -पुनम पवार यांनी केले. कथाकथन स्पर्धेचे संयोजन कुणाल पानपाटील व हेमांगी गवांदे यांनी केले. कथाकथन स्पर्धेचे पंच म्हणून कार्य उपप्राचार्य घनश्याम सोनवणे व जयेश बागले यांनी पाहिले. फोटोग्राफी व व्हिडीओ शूटींग नम्रता गोसावी आणि अंजली लाडे यांनी केली. तसेच कार्यक्रमाची उत्तम आणि सुंदर सजावट किरण गवळी, भूप्रेंद्र साळूंखे, दीपमाला अहिरराव यांनी केली होती. शेवटी कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.