“प्रचिती पब्लिक स्कूल” पिंपळनेर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रम
साक्री :प्रचिती पब्लिक स्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजन मयुरी सोनार यांनी केले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अश्विनी पगार आणि गांधीजी यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. तसेच सुनिता जाधव यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मत व्यक्त केले.
“एक थे लाल और एक थे बापू दोनो मे था अलग सा जादू ” “लालाजी बोला जय जवान और जय किसान बापू बोले रघुपती राघव राजाराम” “देश का सुख था उनका सपना कर दिया जीवन साकार अपना”
या शब्दात त्यांनी मत व्यक्त केले. तसेच शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांनी गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. पाचवी व सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर नाटीका सादर केली. नाटकाला सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. तसेच शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आजच्या दिवशी प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी स्टोरी टेलिंगच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांच्या गोष्टी सादर केल्या. आजच्या कार्यक्रमासाठी रीनल सोनवणे,योजना जाधव यांनी फलक लेखन केले. कार्यक्रमाची सजावट किरण देवरे, माधुरी शिंदे, अर्चना देसले, जागृती बिरारीस, वैशाली वाघ, अश्विनी पगार, सरिता अहिरे यांनी केली. पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाच मार्गदर्शन कल्याणी काकुस्ते व तृप्ती मुसळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक काजल राजपूत यांनी केले. शाळेचे शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे छायाचित्र वैशाली वाघ यांनी तर चित्रफित (व्हिडिओ) कल्याणी काकुस्ते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सरिता अहिरे यांनी केली.