पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्यूकशेन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे (पीसीसीओई) संगणक विभागाचे प्रा. केतन देसले यांचा ‘‘ॲस्मा’’ (ASMA – adoption of social media in academia) इंडियाज टॉप 30 मार्केटर्स इन एज्युकेशन 2019’’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नोलॉजिचे संचालक डॉ. एच. चतुर्वेदी आणि त्रिची येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. बी. मेत्री यांच्या हस्ते प्रा.देसले यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, मेडल देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल मार्केटिंग आणी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणाऱ्या भारतातील निवडक 30 प्राध्यापकांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रा. देसले हे पीसीसीओई मध्ये संगणक अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पीसीईटीची डिजिटल प्रसिद्धीची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे. या आधी देखील त्यांचा “यंग लीडरशीप इन एज्युकेशन 2019” या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपक्रमात त्यांचे महत्वपूर्ण योगदान असते. देसले यांचा जनसंपर्क, उत्कृष्ट संवाद कौशल्य यामुळे अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा संस्थेत उमटवला आहे.
या पुरस्काराबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर, यांनी प्रा. देसले यांचे अभिनंदन केले.
पीसीसीओईचे प्रा. देसले यांचा ‘‘ॲस्मा इंडियाज टॉप मार्केटर्स इन एज्युकेशन’’ पुरस्काराने गौरव
