पिंपरी   नेत्यांचे  व मतदारांचे आशीर्वाद अन कार्यकर्त्यांच्या बळावर विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे केले.  अण्णा बनसोडे यांनी आज राष्ट्रवादी -काँग्रेस आघाडीच्या वतीने पिंपरी मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला.

यावेळी बनसोडे म्हणाले की,  राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार हे आमचे दैवत तर अजितदादा आमचे नेते आहेत.  ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे काम करीत आहे. राष्ट्रवादीने मला नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्षपद,  दोनदा विधानसभेची उमेदवारी दिली होती. मागील विधानसभेत भाजपाची लाट असतानाही मी पिंपरीत फार थोड्या मतांनी पराभूत झालो होतो. त्यातून खचून न जाता मी पुन्हा नव्या उमेदीने पक्षाचे काम सुरु ठेवले. मागील लोकसभेत पार्थ पवारांचे काम केले. शरद पवार, अजितदादांनी माझ्यावर पुन्हा विश्‍वास व्यक्त करून मला पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून तिसर्‍यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे. मतदारांचा आमच्या पक्षनेतृत्वावर माझ्यावर विश्‍वास आहे. शहराचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे,  महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी-माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाचे काम जोमाने उत्साहाने करीत आहेत. आज उमेदवारी अर्ज भरताना मला मिळालेला कार्यकर्त्यांचा पाठिंबा ही माझ्या विजयाची नांदी आहे. पिंपरीत राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित आहे, असा मला विश्‍वास वाटतो.असे प्रतिपादन  आण्णा बनसोडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here