पिंपरी :- रस्त्यावरील महावितरणच्या डीपीचा स्फोट झाल्याने पादचारी महिला गंभीर जखमी झाली आहे. त्या महिलेला उपचारासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने उपचारासाठी नेल्याने पुढील अनर्थ टळला. चिखली,  नेवाळेवस्ती चौकात शुक्रवारी (दि. १५ ) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

सुप्रिया संजय खांडेकर (वय ४०, रा. नेवाळेवस्ती) असे जखमी महिलेचे नाव आहे. खांडेकर या मुलांना घेण्यासाठी शाळेत जात होत्या. त्यावेळी रस्त्यावरील महावितरणचा डीपीमधून मोठा उपचार आवाज होऊन स्फोट झाला. त्यामुळे डीपीच्या परिसरात आग लागली. यात खांडेकर यांच्या साडीने पेट घेतला. त्या गंभीर भाजल्या. त्यामुळे किरण नेवाळे, विशाल नेवाळे आणि योगेश नेवाळे यांनी तेथे धाव घेतली.

डीपीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच, रुग्णवाहिका बोलावून महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी शहरात जळीत रुग्णांवर उपचारासाठी विभाग नसल्याचा फटका या महिलेला बसला. त्यामुळे नेवाळेवस्ती परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त कला. त्या महिलेला ‘ वायसीएम ‘ रुग्णालयात उपचारासाठी नेले होते . मात्र , येथे मोठा उपचार होत नसल्याचे सांगितल्याने खासगी रुग्णालयात नेले. तेथेही चाळीस टक्क्यांवर जळीत रुग्णांवर उपचार होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. अखेर त्या महिलेला ससून रुग्णालयात नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here