पिंपरी चिंचवड : महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महात्मा जोतीराव फुले पुण्यतिथी निमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम एक दिलाने पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

समता परिषदेच्या वतीने पुण्यतिथी निमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व कार्यक्रमांचे नियोजनाबाबत कार्यकारिणीची नुकतीच बैठक संपन्न झाली. यात सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचा महत्वाचा निर्णय झाला. यावेळी  शहरातील सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक आणि नगरसेविका तसेच समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी, महात्मा फुले समता परिषदेतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, तसेच समता पुरस्कार दिला जातो. मी फक्त अध्यक्ष आहे, माझ्या नावाला आणि कामाला दाद मिळते, हे सर्वस्वी श्रेय तुमचे सर्वांचेच आहे अशा शब्दात बैठक यशस्वी होण्यासाठी मनापासून कष्ट केलेल्या शहरातील कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here