पिंपरी चिंचवड – चिंचवड येथील हेवन स्पोर्टस् डेव्हलपमेंट अॅड रिसर्च सेंटर, या क्रिडा संस्थेच्या वृंदा सुतार, परिघा क्षीरसागर, प्रणित आढाव, रुजुला देवधरे या एरोबिक्स आणि जिम्नॅस्टिक खेळाडूंना राज्यस्तरावरील स्पर्धेत रौप्य पदके मिळाले. याबद्दल स्थायी समितीच्या सभागृहात सभापती विलास मडिगेरी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, नगरसदस्या झामाबाई बारणे, आरती चौंधे, प्रज्ञा खानोलकर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार नगरसचिव उल्हास जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.