पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ५३ कोटी ८३ लाख इतक्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
विद्युत विभागासाठी आवश्यक विविध पोल्स साहित्य खरेदीकामी येणाऱ्या ५१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत बाळाचे प्रसुतीपुर्व अपंगत्व ओळखण्यासाठी गर्भवती महिलांची व प्रसुतीपश्चात नवजात बालकांची तपासणी करणेकामी येणाऱ्या ७१ लाख रूपये, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ४ मधील दिघी मधील गणेश नगर परिसरातील मलनि:सारण नलिकेचे सुधारणा करणेकामी ३१ लाख रूपये, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ६ मधील चक्रपाणी वसाहत व उर्वरीत परिसरात आवश्यकतेनुसार ड्रेनेज लाईन बदलणेकामी येणाऱ्या ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
इ प्रभागाअंतर्गत सेक्टर २३ ते सेक्टर ७/१० व गवळीमाथा पर्यंतच्या ग्रॅव्हीटी लाईनची दुरूस्ती विषयक कामे येणाऱ्या २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्युत विभागाकडील कामांसाठी १ कोटी २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. से.क्र.२३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्र टप्पा क्र.१,२,३ व ४ मधील विविध युनिट्स साठी उपलब्ध असलेले वाल्व्ह व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या ७५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील मोशी गावठाण व शिवाजीवाडी पिरिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ब क्षेत्रीय कार्यालयाअंर्गत प्र.क्र.१७ मध्ये जलनि:सारण विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या ३२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण द्राअंतर्गत प्रभाग क्र. ७ मधील गव्हाणे वस्ती व आदिनाथ नगर परिसरातील मलवाहिनी सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या २६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र.४ मधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने देखभाल व दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या २५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ४ मधील दिघी मधील दत्तनगर परिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासह शहरातील विविध प्रबागांमधील विविध विकास कामांच्या एकूण 53 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.