Chaupher News
दिल्लीमधील जामिया येथे गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शाहीनबागमध्ये गोळीबार झाल्याने दिल्लीत वातावरण तापलं आहे. धक्कादायक म्हणजे शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असता “या देशात फक्त हिंदूंची चालणार, इतर कोणाची नाही” असं वक्तव्य केलं. पोलिसांना हा तरुण पूर्व दिल्लीचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिकत्व नोंदणी विरोधातील आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून शाहीनबाग चर्चेत आहे, तसंच हा परिसर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मुद्दा बनू लागला आहे. तरुणाने आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरिकेट्सजवळ हवेत गोळीबार केला आणि ही जागा तात्काळ खाली करा अशी धमकी दिली. गोळीबार होताच पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं.