Chaupher News

मुंबई : सरकार कुठलंही असो तुमचा आमचा सामन्यांचा पैसा हमखास खर्च होतो. कारण मंत्र्यांना लागणारे चकचकीत बंगले, मंत्र्यांची दालनं यावर सध्या कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागानं 31 बंगल्यांसाठी निविदा काढल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे निविदा सादर होण्याआधीच बंगल्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं बंगल्याची कंत्राटं देण्यास सुरुवात केली आहे.

सर्वात जास्त खर्च महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन आणि अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर होत आहे. रॉयल स्टोनसाठी एक कोटी 81 लाख तर रामटेकसाठी एक कोटी 48 लाखांचा खर्च होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here