Chaupher News
दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनातील मृतांचा आकडा आज १८ वर पोहचला आहे. आज (बुधवार) सकाळी देखील दिल्लीतील गोकुळपुरी भागात हिंसक आंदोलनास सुरूवात झाली होती. या ठिकाणी काही समाजकंटकांनी एका दुकानासही आग लावली. ईशान्य दिल्लीतील विविध भागांमध्ये मंगळवारी दिवसभर बेफाम दंगलखोरांनी पोलिसांना न जुमानता चौकाचौकांमध्ये सशस्त्र हिंसाचार माजवला. या परिसरात अराजकतेने थैमान घातलेले पाहायला मिळाले. हिंसाचारप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.