चौफेर न्यूज – दहावीच्या निकालासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्राची रुतलेले चक्र पुन्हा फिरत होणार असल्याने विद्यार्थी व पालकांनासह शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाही मोठा दिलासा मिळाला असून दहावीच्या निकालासाठी निश्चित करण्यात आलेल्या अंतर्गत मुल्यामापनाच्या सुत्राचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत आहे. कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कशा पद्धतीने जाहीर होणार या कडे लाखो विद्यार्थी व पालकांसह शिक्षक आणि संस्थाचालकांचेही लक्ष लागले होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसह मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनीही यांनी स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाची पद्धत निश्चित झाल्याने आता लवकरात लवकर निकाल तयार करून तो जाहीर केल्यास विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर होऊ शकेल, अशी अपेक्षाही विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दहावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र विद्यार्थी हिताचे ; सुत्राचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत





















