पुणे : यंदाची 31 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 4 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी घोषणा या समितीचे सचिव अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत केली. स्पर्धेचे संचालक प्रल्हाद सावंत हे देखील उपस्थित होते.
या स्पर्धेबाबत छाजेड म्हणाले की, यंदाची स्पर्धा पूर्ण मॅरेथॉन 42 किलोमीटरची पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये अर्ध मॅरेथॉन असणार असून ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार आहे. याशिवाय व्हीलचेअर हा अपंगांसाठी तर पंधरा वर्षांखालील मुले-मुली, कुमार खेळाडूंसाठी गट असणार आहे. ती सर्व वयोगटातील पुणेकरांसाठी खुली असणार आहे. रिओ ऑलिम्पिकमधील ललिता बाबर, सुधा सिंग, कविता राऊत, आदिल सुमारिवाला, रचिता मिस्त्री, असे 31 ऑलम्पियन या स्पर्धे दरम्यान उपस्थिती लावणार आहेत. पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे वैभव असलेले व आपले संपूर्ण आयुष्य या क्षेत्रासाठी वाहून घेतलेल्या प्रल्हाद सावंत यांच्या गौरवार्थ ही मॅरेथॉन जाहीर करण्यात आली आहे.
तसेच यंदा रन फॉर पुणे ही संकल्पना राबविली जाणार आहे. यातून पुणे शहराचा प्रचार आणि प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे. 3.5 किलोमीटर इतक्या अंतराची ही रन असणार आहे. स्पर्धेत यंदा देश विदेशातील स्पर्धक देखील सहभागी होणार आहेत.
स्पर्धेच्या प्रवेशिका नोंदविण्यास ुुु.ारीरींहेर्पिीपश.लेा ऑनलाईनवर प्रारंभ झाला आहे. या संकेतस्थळावर संपर्क साधावा 5 नोव्हेंबरपासून पुणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेश अर्ज उपलब्ध होणार असल्याचे छाजेड
यांनी सांगितले.