महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असतात. अशा परीक्षेसाठी खाजगी शिकवणी किंवा क्लास लावतात. ज्याची फी खूप जास्त असते. म्हणून खाजगी शिकवणी किंवा क्लास सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल असे नाही.
अशा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी व मोफत मार्गदर्शन मिळवू इच्छिणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे मोफत मार्गदर्शन मिळवून घेण्याची सोय असते. पूर्ण महाराष्ट्र मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी एकूण सहा ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत.
अशा मार्गदर्शनासाठी काही सुविधा आहेत का? शासनामार्फत काही सुविधा केलेल्या आहेत का? असतील तर त्या कशा प्रकारे आपण मिळवून घेऊ शकतो? अशा प्रश्नांचा मागोवा घेणारा हा लेख.
- मुंबई siac mumbai
- नागपूर siac nagpur
- कोल्हापूर siac kolhapur
- औरंगाबाद siac aurangabad
- अमरावती siac amaravati
- नाशिक siac nashik
वरील सर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विशिष्ट पद्धती अवलंबण्यात येते. ज्यामध्ये प्रवेशपरीक्षा घेऊन गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येतो.
या परीक्षांमध्ये पूर्ण राज्यभरात विविधता होती. प्रत्येक प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र स्वतंत्र रीतीने प्रवेश परीक्षा आयोजित करीत होती. प्रवेश परीक्षेच्या आधारे गुणानुक्रम अनुसार विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना प्रवेश दिला जात असे.
- दिनांक 27 नोव्हेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक केंद्रावर ती होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्यामध्ये एकत्रित प्रवेश परीक्षा राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
- महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.
- सध्या अस्तित्वात असलेल्या सहा प्रशिक्षण केंद्रातील तसेच काळाच्या ओघात स्थापन होणाऱ्या या पुढील जिल्हास्तरावरील प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी ऑनलाइन एकत्रित सामायिक लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात यावी.
- परीक्षेच्या अर्जासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 500/- रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांना 250/- रुपये एवढे शुल्क आकारण्यात यावे.
- उमेदवारांना लेखी परीक्षेत व मुलाखतीमध्ये प्राप्त गुण व त्यांनी प्रशिक्षण केंद्रासाठी निवडलेला पर्याय या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यादीच्या आधारे उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.
- शासनाने वेळोवेळी विहित केलेले आरक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहील.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदावरील नियुक्तीसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पॅनलच्या आधारे उमेदवारांची मुलाखतीसाठी पॅनल तयार करण्यात यावे.
- प्रशिक्षण केंद्रासाठी लागणारे महाविद्यालय व आवश्यक तो कर्मचारीवर्ग संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांनी उपलब्ध करून द्यावा.
- राज्यातील प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम निश्चित करण्यापासून उमेदवारांची अंतिम निवड करण्यापर्यंतच्या सर्व कार्यवाहीसाठी संचालक राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.
- प्रवेश परीक्षेसाठी घेतलेली शुल्क रक्कम राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई च्या खात्यात जमा करण्यात यावी व सदर रक्कम परीक्षेसाठी आवश्यक प्रणाली व इतर अनुषंगिक बाबी साठी खर्च करण्यात यावी.
मार्गदर्शन केंद्रांचे महत्व :-
- महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांना राज्य शासनाच्या मार्फत उपलब्ध करून दिलेली ही एक चांगली संधी आहे असे म्हणावे लागेल. योग्य व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुणांच्या आधारे प्रवेश म्हणजे उमेदवाराच्या बुद्धिमत्तेचा योग्य सन्मान म्हणावा लागेल. राज्यामध्ये एका बाजुला लाखो रुपयाची माया खाजगी शिकवणी वाले गोळा करत असताना दुसऱ्या बाजूला मोफत संघ लोकसेवा आयोगाचे मार्गदर्शन राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
- विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, या ठिकाणी प्रवेश मिळणाऱ्या उमेदवाराला राज्य शासनाच्या वतीने विद्यावेतन ही दिले जाते. हे विद्यावेतन उमेदवार त्याच्या तयारीसाठी वापरू शकतो. अंतिमतः उत्तम प्रशासक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासन प्रयत्न करत आहे. देशाच्या प्रशासन व्यवस्थेत मराठी उमेदवारांना संधी मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचा हा महत्त्वाचा प्रयत्न मानावा लागेल.
- विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात.
- अपेक्षा आहे मित्र-मैत्रिणींनो तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये मिळाले असतील अधिक माहितीसाठी शासनाचा जीआर या ठिकाणाहून डाऊनलोड करून घेऊ शकता. सदर निर्णयाची पीडीएफ फाईल तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता येथून.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. https://www.maharashtra.gov.in/1125/Home
सौ. https://www.nitinsir.in/siac-entrance-exam-siac-mumbai/