आ. अनिल गोटे : पांझरेवर होणार ब्रिजकम बंधारा रस्यांचे होणार काम
शहरातील रहदारीच्या समस्येवर तोडगा म्हणून पांझरा नदीलगत समांतर प्रत्येकी साडेपाच किलोमीटरच्या रस्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. या दोन रस्यांकरीता मुख्रमंत्र्यांकडे सादर 60 कोटींच्या प्रस्तावापैकी 30 कोटी रुपये यंदाच्या आर्थिक वर्षात नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून बांधकाम वर्गाकडे वर्ग करण्याचे निर्देश मुख्रमंत्र्यांनी दिले आहेत. पांझरा नदीवर आणखी ब्रिज कम बंधारा उभारण्यासाठी आणि या दोन रस््यांशिवाय इतर रस्यांच्या कामासाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे आ. गोटे रांनी सांगितले. साक्री रस्यांसाठी मंजूर झालेला 26 कोटी 50 लाख रूपयांचा निधी जानेवारी महिण्यात बांधकाम विभागाला प्राप्त होईल, अशी माहिती आ. गोटे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला तेजस गोटे, ओम खंडेलवाल, भीमसिंग राजपूत, दिलीप साळुंके, संजय बगदे, भारती माळी, निलम वोरा आदी उपस्थित होते.
धुळे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात वर्षभरात चार ड्रायपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मालेगाव, सटाणा, साक्री भागातील शेतकऱ्यांनाही व्हावा, अशी इच्छा आपण गडकरी रांना दिल्लीत प्रत्यक्ष भेटून यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यानुसार धुळे-नाशिक रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याची मागणी मान्य केली आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आता जेएनपीटी ते इंदूर असा राहील, अशी माहिती आ.अनिल गोटे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
मनमाड-मालेगाव, धुळे, शिरपूर, नरडाणा, सेंधवा, इंदूर असा रेल्वेमार्ग करणे हे रेल्वे विभागाचे काम होते; मात्र निधीच्या टंचाईमुळे केंद्रीय भुपृष्ठ व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयामार्फत 5 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा निर्णय घेतला.
यातून जेएनपीटी ते इंदूर अशा मार्गाची उभारणी होणार आहे. त्यामुळे हा मार्ग आता न्हावा शेवा ते इगतपुरी पुढे मनमाड, मालेगाव, धुळे, सेंधवा, धामनोद, महू, इंदूर असा नवीन 9 हजार 500 कोटी खर्चाचा मार्ग होणे अपेक्षीत आहे, असे आ. गोटे रांनी सांगितले. त्याचप्रमाणे गडकरी यांनी महाराष्ट्रात 4 ठिकाणी ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केली आहे. त्याचा लाभ धुळे-नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठीच हा मार्ग होणे अपेक्षीत असल्याची मागणी आपण केली होती. त्याच्या सर्वेक्षणास गडकरी रांनी मान्यता दिली असल्याचे आ. गोटे म्हणाले.