साक्री : तालुक्यातील शिवाजीनगर येथील सौरऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या 81 सुरक्षारक्षक व 4 माजी सैनिकांना कामावरून कमी केल्याने मेघा इंजी इन्फ्रा स्ट्रर सोलर पॉवर कंपनीच्या विरोधात सुरक्षा रक्षकांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरवात केली आहे.

उपोषणकर्त्यापैकी काहींची प्रकृती खालवत चालल्याने साक्री तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा केले. हे सुरक्षारक्षक तालुक्यातील भूमिपुत्र असून संबधित कंपनीने त्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. चर्चेस भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत भोसले, सरचिटणीस राजेंद्र खैरनार, जि.प.सदस्य विजय ठाकरे, योगेश भामरे, गणोश सोनवणो, स्वप्नील भावसार, राकेश दहिते आदी उपस्थित होते. शिसेनेनेही उपोषणकर्त्यांना पाठींबा दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here