पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी योग्य वेळी उमेदवार जाहीर केले जातील. इतर पक्षाचा समोरचा उमेदवार बघून इच्छुक निर्णय घेतात. मात्र पक्ष सर्व खबरदारी घेऊनच तिकीट देईल, अनेक जण वेगवेगळे डावपेच आखतात आमच्या जवळ येऊन वकिली पॉईंट टाकतात. मात्र एक लक्षात घ्या तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात तिथला मी हेडमास्तर आहे, आम्ही काही पतंग नाही उडवत, विटी दांडू नाही खेळत तुमचं काय सुरु असत ते आम्हाला चांगलं कळत अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यानी कार्यकर्त्याना सुनावले.
सक्षम इच्छुक उमेदवाराचे प्रशिक्षण कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महापौर प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच वर्षात केलेली कामे जनतेसमोर घेऊन जावे. तसेच आघाडी सरकारच्या काळात पुणे शहरासाठी 2400 कोटी आणले. त्या माध्यमातून करण्यात आलेली कामे नागरिकांपर्यंत पोहचवा. नम्रपणे नागरिकाशी संवाद साधवा. सर्वांनी एकत्रित काम करावे.