माजी नगरसेविका आरती चोंधे यांच्याहस्ते पिंपळे निलख येथे कौतुक सोहळा संपन्न
पिंपरी :- विशालनगर मधील आपल्या मैत्रीणी नितू करंजुले, शुभांगी भोकरे, पूजा खोत, वर्षा गुंजाळ, सरिता पाटील या पंचकन्यांनी केदारकांठा शिखर सर केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या पंचकन्यांनी तिरंगा केदारकांठा शिखरावर दिमाखात फडकवला याचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरोवद्गार माजी नगरसेविका आरती चोंधे यांनी काढले.
या पंचकन्यांचा कौतुक सोहळा नुकताच पिंपळे निलख येथे संपन्न झाला. माजी नगरसेविका आरती चोंधे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. केदारकांटा मोहिमेत १७ वर्षापासून ७० वर्षापर्यंतच्या १० महिला यात सहभागी झाल्या होत्या. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत उणे १० ते १५ डिग्री तापमान याठिकाणी होते. बर्फवर्षाव होत असताना पंचकन्यांनी हे यश संपादन केले. भारतीय प्रजासक्ताच्या पूर्व संध्येला समिट वर ७४ ध्वजांची पताका फडकावून भारतमातेला १३ हजार फुटांवरून वंदन केले. प्रजासत्ताक दिनी बेस कॅम्प सांक्री येथे राष्ट्रगीत गाऊन देशाला मानवंदना अर्पण केली. या ग्रृपमधील या पंचकन्यांच्या यशस्वितेला साजेसा कौतुक सोहळा माजी नगरसेविका आरती चोंधे यांनी आयोजित केला होता.
यावेळी यशश्री महिला संस्थेच्या सविता इंगवले, कुंदा पाटे, उज्वला पोवार, अर्चना पवार, सुवर्णा गाडे, योगिता जाधव, स्मिता कुलकर्णी, संध्या निखळ, अलका मकवाना, वेदवंती उपाध्याय, सुलभा गराडे, स्नेहल देसले उपास्थित होते.