प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी



पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे आज दिनांक ३/१/२०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
१) सावित्री आईची थोर पुण्याई,
त्यामुळेच शिकल्या माझ्या,
आई ताई आणि बाई.
२) शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार
तीच सावित्री आज जगाची शिलेदार
आजच्या या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक माननीय श्री. प्रशांत पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे समन्वयक श्री राहुल अहिरे सर व मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आजच्या स्त्रिया ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जी प्रगती करता आहेत त्या प्रगतीचे सर्वस्व श्रेय जर कोणाला जात असेल तर ते सावित्रीबाई फुले यांनाच. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची कास धरली व असंख्य संकटांना न घाबरता. अखंडपणे स्त्री शिक्षणाचं ध्येय त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या या कार्यात त्यांना ज्योतिबा फुले यांचे योगदान लाभले होते.
आजच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक्षा अहिरे मॅडम यांनी केले होते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता अहिरे मॅडम यांनी केले होते. त्यांनी आपल्या घोषवाक्यांच्या मार्फत स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
शाळेचे समन्वयक श्री. राहुल अहिरे सर यांनी आपल्या शब्दातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटविले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .अनिता पाटील मॅडम यांनी आपल्या शब्दातून व्यक्त करीत असताना सांगितले की, आज आम्ही या जागेवर फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहोत.
सावित्रीबाई फुले यांची भूमिका इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी काव्या घरटे व आनंदी शेवाळे यांनी साकारली होती. इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी प्रांजल बिरारीसने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती सांगितली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर अधिक माहिती वैशाली वाघ मॅडम यांनी दिली होती.
आजच्या कार्यक्रमासाठी फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे कार्य मयुरी मॅडम व दिव्या मॅडम यांनी करून कार्यक्रमाची आठवण कायमची जपली. तसेच बातमी लेखनाचे कार्य किरण देवरे मॅडम यांनी केले होते. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे शाळेत शिक्षणाबद्दल असलेले विचार अधिकच प्रभावी झाले.















