प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
साक्री येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा

साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कार्यक्रम संयोजक इन्चार्ज म्हणून श्रीमती नम्रता गोसावी व सौ. स्मिता नेरकर यांनी जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
कार्यक्रमादरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला तसेच विद्यार्थिनींमध्ये समानता, शिक्षण व स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी शाळेचे आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनीही विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम समन्वयक श्री तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कुणाल पानपाटील यांनी केले. सौ. मनीषा माळी यांनी विद्यार्थिनींना बालिका दिनानिमित्त दोन शब्द सांगितले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.















