प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात

पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे नववर्षाचे स्वागत आनंदी व उत्साही वातावरणात करण्यात आले. शाळेचे संस्थापक माननीय श्री प्रशांत भिमराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने नववर्ष सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम उपस्थित होते.
शाळेचे संस्थापक माननीय श्री प्रशांत भीमराव पाटील साहेब यांनी सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नववर्ष निमित्त शुभेच्छा दिल्या. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील मॅम विद्यार्थी व शिक्षक सर्वांनी मिळून नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जागृती मॅम यांनी केले.
कार्यक्रमासाठी शाळेच्या आवारात सुंदर व आकर्षक रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी स्मिता मॅम, प्रेरणा मॅम, लीना मॅम व प्रतीक्षा मॅम यांनी अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारली. कार्यक्रम स्थळी लावलेले फलक दिव्या मॅम यांनी सजवले होते. ज्यामुळे संपूर्ण परिसर अधिकच प्रसन्न दिसत होता. कार्यक्रमातील क्षणचित्रे जतन करण्यासाठी सर्व वर्ग शिक्षकांनी फोटो काढले तर वैशाली वाघ मॅम यांनी फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करून कार्यक्रमाची आठवण कायमची जपली. बातमी लेखनाचे काम मयुरी मॅम यांनी केले.
आजच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे शाळेत आनंद उत्साह व सकारात्मक वातावरण निर्माण झाले.















