प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये युवादिन व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवादिन तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन सौ. स्मिता नेरकर व श्रीमती नम्रता गोसावी यांनी केले होते. कार्यक्रमासाठी आदरणीय संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी शुभेच्छा संदेश दिला. प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी साबळे यांनी केले. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे श्री. गणेश नांद्रे व सौ. मनिषा माळी यांनी सादर केली. कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.















