प्रचिती पब्लिक स्कूल मध्ये मॅजिक ऑफ सायन्स विज्ञान शिबिर
व अभ्यास कौशल्य मार्गदर्शन शिबिर उत्साहात साजर

पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे शुक्रवार दि. 9 जानेवारी 2026 रोजी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनासाठी विज्ञान व समाजशास्त्र, गणित या विषयांना अनुसरून विद्यार्थ्यांनी विविध संशोधनात्मक उपकरण (प्रोजेक्ट) सादर केले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते. प्राचार्या अनिता पाटील, शाळेचे व्यवस्थापक राहुल अहिरे तर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी दिनेश कालेल, राम रानगट व तसेच प्रचिती प्रि प्रायमारी स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूल साक्री चे प्राचार्य वैशाली लाडे, स्कूल समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे तसेच पर्यवेशक म्हणून लाभलेले सचिन जाधव, मयूर भदाणे आदी मान्यवर होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, सी व्ही रमण यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. रॉकेटची प्रतिकृती अवकाशात प्रक्षेपण करून कार्यक्रमाचे आगळ्या- वेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी दिनेश कालेल यांचा सत्कार राहुल अहिरे, राम रानगाट याचा सत्कार अनिता पाटील यांनी केला. तसेच पर्यवेशक यांचा सत्कार राहुल अहिरे यांनी केला.तद्नंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व तसेच दिनेश कालेल यांनी विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रात्यक्षिक दाखवले.
शेवटी विध्यार्थ्यांनी जे प्रकल्प सादर केले त्याचे सचिन जाधव सर, मयूर भदाणे सर यांनी शाळेतील विज्ञान प्रदर्शनाचे निरीक्षण केले. तसेच, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रदर्शनाची संकल्पना सादर केली. संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले जीवन अधिकाधिक सुखर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांदैनंदिनकडून लावले जातात. संशोधनाचे बिज विद्यार्थ्यांमध्ये रोवले जावे, या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन्चे आयोजन करण्यात येते. संकुचित विचार बाजुला सारून मोठे काम करून दाखविण्याची दृष्टी विद्यार्थ्यांला येते. विद्यार्थ्यांचे विज्ञान शिक्षण त्याची विज्ञान आवड, कुतुहल जागृती, जिज्ञासापुर्ती आणि संशोधनवृत्ती जोपासणे इ. उद्देश विज्ञान प्रदर्शनामागे असतात, असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी एकुण ५०उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले होते. या प्रदर्शनात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणितीय तसेच पर्यावरण संवर्धनाशी निगडित मॉडेल्स ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगांद्वारे विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट केले. उपस्थित शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक केले.विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांची सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते.यामध्ये विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण, वाहतूक संकेत, पवनचक्की, सोलर सिस्टीम,सुंदर शहर, हवा प्रदूषण, गावाचे सुंदर दृश्य, चंद्र्यान,सूर्यमाला, वायू प्रदूषण, पवन चक्की, कोणाचे प्रकार, गणितीय पार्क, पृथ्वीचे थर, ज्वालामुखी, हरितगृह, हॉलोग्राम, वातावरणातील स्थर . व कार्यक्रमात स्वागतासाठी इयत्ता ६वी व ४ वी मधील विद्यार्थिनींनी उत्तम असे स्वागत गीत सादर केले. या गीताचे संयोजन सुनीता जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन राहुल अहिरे सर,आश्विनी पगार, सायली पवार,प्रेरणा नांद्रे, यांनी संयोजन करून या कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाची जाणीव करून देऊन त्या विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली. शेवटी विद्यार्थ्यांनी जे विविध प्रकल्प सादर केले.व विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रत्येक्ष भेट देऊन या प्रकल्पांची पाहणी केली व विद्यार्थ्यांमध्ये “एक नवी आशा व नवी दिशा” त्यांना या विज्ञान प्रदर्शनामधून दिली जाते ही आशा त्यांनी बाळगली आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून सर्व पालकांनी कौतुक केले. या कार्यक्रमात रांगोळी सुनीता जाधव, शितल शिंपी, स्मिता निकाले,व सुंदर असे फलक लेखन राजेंद्र पवार सर,लीना अहिरे , वैशाली जगताप व उत्तम सजावट किरण देवरे, सरिता अहिरे, योजना जाधव, वैशाली वाघ,जागृती बिरारीस, पल्लवी अहिरे, मयुरी सोनार, दिव्या जाधव यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले.शेवटी सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, शाळा समन्वयक यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.,















