प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर आनंद मेळावा मोठ्या
उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला

पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर आज दिनांक 29/12/2025 रोजी मोठ्या उत्साहात आनंद मेळावा (Fun Fair) चे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मनोरंजनासोबतच सर्जनशीलता, सहकार्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे हा होता.आजच्या कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन आदरणीय शाळेचे संस्थापक माननीय श्री प्रशांत भीमराव पाटील यांच्या नियोजनात करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील व सेक्रेटरी ऑफ एकविरा फाउंडेशन श्रीमती कविता प्रशांत पाटील हे उपस्थित होते. व त्यांचे कन्यारत्न कु. प्रचिती पाटील व कुमारी स्वरा पाटील यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या स्वागताने करण्यात आली त्यांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थिनींनी लावण्या खैरनार व केजल पाटील यांनी औक्षण केले तसेच लेझीम नृत्यद्वारे अतिथींचे स्वागत करण्यात आले. व त्यानंतर अतिथींचे स्टेजवर आगमन झाले. व त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रतिमा पूजन करत असताना तिथे शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील व श्रीमती कविता पाटील शाळेची समन्वयक श्री. राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम व आजच्या कार्य क्रमाच्या इन्चार्ज सुनिता जाधव मॅम व किरण देवरे मॅम व शाळेचे शिक्षिका व शिक्षकेतर के कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. तसेच आलेल्या अतिथींची शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम यांच्या हस्ते करण्यात आला. व त्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर करून पाहुण्यांचे व पालकांचे स्वागत केले या प्रकारे कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे प्रमुख अतिथी शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील व श्रीमती कविता प्रशांत पाटील तसेच शाळेचे संयोजक श्री. राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी विविध स्टॉल्स लावले होते. त्यामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळांचे स्टॉल, तसेच मनोरंजनाचे अनेक खेळ होते.
खाद्य पदार्थ वडापाव दाबेली, चायनीज, पाव वडा, सँडविच, कांदा भजी पावभाजी, मूंग भजी, समोसे, कचोरीसाबुदाना वडा, पाणीपुरी, मेथी पराठे, राघवी मसाले, रेडीमेड खाद्य, बिर्याणी, सफरचंद, केळी, भरीत पूरी भाकर, मसाला पापड़गोड शेव, देवपूजा साहित, ऑरगॅनिक प्रॉडक्ट, खमंग, पोंगे बटाटे,इडली चटणी, अमूल प्रॉडक्ट, भेळ, स्नॅक्स, केळी वेफर्स, स्टेशनरी, गुलाबजाम, बेकरी कप केक, छोटे समोसे, पाणी बॉटल इत्यादी पदार्थ उपलब्ध होते.
खेळांच्या स्टॉलमध्ये जम्पिंग जॉय, रेस कार, मिकी माऊस, व पाळणा यांसारखे मजेशीर खेळणी होते. तसेच मुलांच्या आनंदासाठी व मनोरंजनासाठी उंट देखील बोलवण्यात आले होते सर्व लहान मुलांनी कॅमल राईड चा आनंद घेतला. सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या फन फेअरचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला तसेच संघभावना आणि व्यवस्थापन कौशल्य विकसित झाले.
आजच्या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या शिक्षिका सौ. सुनिता मॅडम व किरण मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात पूजा आयोजनाने झाली. पूजेची जबाबदारी योजना मॅडम यांनी सांभाळली. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सरिता अहिरे मॅम यांनी केले. आनंद मेळावा तयारीसाठी विविध जबाबदाऱ्या शिक्षकांना देण्यात आल्या होत्या. बॅनर साईज व बॅनर थिंग्स ची जबाबदारी किरण मॅडम, दिव्या मॅडम, प्रेरणा मॅडम, शितल मॅडम व वैशाली जगताप मॅडम यांनी सांभाळली. रांगोळी चे काम अर्चना मॅडम, जागृती मॅडम, अश्विनी मॅडम व प्रतीक्षा मॅडम यांनी केले. मेन फोटोसाठी सायली मॅडम व स्टॉल फोटोसाठी जागृती मॅडम तर व्हिडिओ साठी मयुरी मॅडम होत्या. डस्टबिन मेकिंग चे काम योजना मॅडम, व लीना मॅडम, समाधान दादा व मावशी यांनी केले कुपन मेकिंग डिस्ट्रीब्यूशन चे काम सर्व शिक्षकांनी मिळून केले. फूड चार्ट व प्राईज मेकिंग च्या प्रिंट ची जबाबदारी पल्लवी मॅडम यांनी पार पाडली. पेंडॉल कॉलिंग साठी सुनिता मॅडम होत्या.
कार्यक्रमात लेझीम नृत्य सादर करण्यात आले, ज्याचे आयोजन सायली मॅडम व प्रेरणा मॅडम यांनी केले. गेस्ट औक्षणाची जबाबदारी वैशाली मॅडम यांनी सांभाळली.
कार्यक्रमाच्या आधी व नंतर ग्राउंड क्लिनिंग चे काम समाधान, मावशी, काका, ड्रायव्हर व सर्व शिक्षकांनी केले. तसेच पार्किंगची व्यवस्था काका व समाधान यांनी केली. व बातमी लेखनाचे काम वैशाली मॅडम यांनी केले.
अशा रीतीने कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला. हा आनंद मेळावा सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या सहकार्यामुळे अतिशय यशस्वी झाला.
सर्वांनी या कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला आणि हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.















