प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये मान्यवर,
क्रीडा विजेते व विद्यार्थी नेतृत्वाचा सन्मान

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे आयोजित आनंद मेळाव्याच्या निमित्ताने सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या समारंभात समाजातील मान्यवरांसह शाळेतील क्रीडा विजेते व विद्यार्थी नेतृत्वाचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन इन्चार्ज सौ. स्मिता नेरकर, सौ. कांचन अहिरराव व श्री. कुणाल देवरे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या कुशल नेतृत्वामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सत्कार समारंभात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेत आयोजित क्रीडा दिनाच्या दिवशी झालेल्या ग्रुप गेम स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या वर्गाच्या संघालाही गौरविण्यात आले.
याचप्रसंगी शाळेतील हेड बॉय व हेड गर्ल यांना त्यांच्या नेतृत्वगुणांसाठी सन्मानित करण्यात आले.
* हेड बॉय – वेदांत पाटील
* हेड गर्ल – युगंधरा ठाकरे
तसेच शाळेतील चारही हाऊसच्या कॅप्टन (लीडर्स) यांचा विशेष सत्कार करण्यात आला
* ब्लू हाऊस कॅप्टन – गौरव भदाणे, दुर्वा देवरे
* रेड हाऊस कॅप्टन – सार्थक चौधरी, समीक्षा चव्हाण
* ग्रीन हाऊस कॅप्टन – मयंक चव्हाण, निकिता देसले
* यलो हाऊस कॅप्टन – आराध्य चव्हाण, नक्षत्रा भामरे
सर्व सन्मान व पुरस्कारांचे वितरण आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील, प्राचार्या सौ. वैशाली लाडे तसेच प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या सत्कार समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना व स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाली. एकूणच हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक ठरला.















