प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये “नवरत्न पुरस्कार” प्रदान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे आयोजित आनंद मेळाव्याच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मान्यवरांना “नवरत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. आई एकवीरा फाउंडेशन संचलित प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला.
* अध्यात्म भूषण पुरस्कार –
महंत योगाचार्य दिनानाथजी महाराज अध्यात्म, योगसाधना व नैतिक मूल्यांचा प्रचार-प्रसार करून समाजाला सकारात्मक दिशा देण्याच्या कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
* आरोग्य सेवा भूषण पुरस्कार –
डॉ. दादाजी धुडकु खैरनार ग्रामीण व शहरी भागात आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी केलेले निस्वार्थ कार्य, रुग्णसेवेसाठी अखंड समर्पण व सामाजिक बांधिलकी यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
* कर्तव्य रत्न पुरस्कार –
मा. श्री. प्रसाद दिलीप रोंदळ (पोलीस उपनिरीक्षक) कायद्याचे काटेकोर पालन, नागरिकांच्या सुरक्षेसाठी निष्ठेने बजावलेली सेवा व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
* आदर्श माता पुरस्कार –
सौ. लतिका जानेश्वर नागरे कौटुंबिक मूल्ये जपताना समाजासाठी प्रेरणादायी कार्य, मुलांच्या संस्कारक्षम घडणीत दिलेले योगदान व आदर्श मातृत्वासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
* निस्वार्थ सेवावृत्ती पुरस्कार –
मा. श्री. रामराव झिपरू ह्याळीस ह्यांनी समाजसेवा, गरजू लोकांना मदत व कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेल्या सेवाभावी कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
* लोकसेवा रत्न पुरस्कार –
मा. श्री. सुरेश सोनराज पारख कोरोना काळात व इतर आपत्कालीन परिस्थितीत समाजासाठी केलेली मोलाची मदत, सामाजिक उपक्रम व लोकसेवेसाठी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
* आदर्श शेतकरी पुरस्कार –
मा. श्री. रोहिदास शंकर मोरे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सेंद्रिय शेतीचा अवलंब व शेती क्षेत्रात केलेल्या अभिनव प्रयोगांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
* उद्योग रत्न पुरस्कार –
चिरंजीव जयेश संतोष शिंदे (युवा उद्योजक) उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत रोजगारनिर्मिती, नवकल्पना व युवा उद्योजकांसाठी प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
सर्व नवरत्न पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते श्री. विनोद कुमावत, श्री. जगदीश संदानशिव, अभिनेत्री सौ. कावेरी पाटील, तसेच आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ. कविता प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळेस शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम संयोजक म्हणून श्री. कुणाल देवरे, सौ. स्मिता नेरकर सौ. कांचन अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या पुरस्कारांमुळे समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
















