‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाने महिलांची मने जिंकली –
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे आयोजित आनंद मेळाव्याच्या निमित्ताने महिलांच्या मनोरंजनासाठी खास आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन इन्चार्ज सौ. स्मिता नेरकर, सौ. कांचन अहिरराव व श्री. कुणाल देवरे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या कुशल नेतृत्वामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम प्रसिद्ध अभिनेते श्री. विलासकुमार शिरसाठ यांनी अत्यंत उत्साहात, विनोदी शैलीत व प्रभावी पद्धतीने खेळवला. त्यांच्या सादरीकरणामुळे महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिलांमधून तीन विजेत्यांची निवड करण्यात आली.
* प्रथम क्रमांक – मेघा विशाल अहिरे (मानाची पैठणी)
* द्वितीय क्रमांक – अश्विनी प्रणराज मोहिते (सेमी पैठणी)
* तृतीय क्रमांक – शुभांगी पंकज भंडारी (सेमी पैठणी)
विजेत्या महिलांना प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते श्री. विनोद कुमावत, श्री. जगदीश संदानशिव, अभिनेत्री श्रीमती कावेरी पाटील, तसेच आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ. कविता प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते आकर्षक पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे महिलांना हक्काचा आनंद, उत्साह व व्यासपीठ मिळाले. ‘खेळ पैठणीचा’ हा उपक्रम आनंद मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरला व उपस्थित महिलांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

















