प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये – आनंद मेळावा उत्साहात संपन्न

साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे आयोजित करण्यात आलेला आनंद मेळावा विद्यार्थ्यांसह पालकांसाठी आनंद, उत्साह व मनोरंजनाची पर्वणी ठरला. अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात हा मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन इन्चार्ज श्री. कुणाल देवरे, सौ स्मिता नेरकर, सौ कांचन अहिरराव यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या कुशल नेतृत्वामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी साबळे व श्रीमती सपना ठाकरे सौ स्मिता नेरकर यांनी केले. या आनंद मेळाव्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव व सत्कार समारंभ पार पडला. आई एकवीरा फाउंडेशन संचलित प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री यांच्या वतीने पुढील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
* अध्यात्मभूषण पुरस्कार – योगाचार्य दिनानाथ जी महाराज
* आरोग्य सेवा भूषण पुरस्कार डॉक्टर दादाजी धुडकू खैरनार – कर्तव्यरत्न पुरस्कार, श्री. प्रसाद दिलीप रोंदळ
* आदर्श माता पुरस्कार – सौ. लतिका ज्ञानेश्वर नागरे
* निस्वार्थी सेवाव्रती पुरस्कार – श्री. रामराव झिपरू ह्याळीस
* लोकसेवा रत्न पुरस्कार – श्री. सुरेश सोनराज पारख
* आदर्श शेतकरी पुरस्कार – श्री. रोहिदास शंकर मोरे
* उद्योग रत्न पुरस्कार – चिरंजीव जयेश संतोष शिंदे
सर्व पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते श्री. विनोद कुमावत, श्री. जगदीश संदानशिव, अभिनेत्री सौ. कावेरी पाटील, तसेच आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ. कविता प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याच प्रसंगी शाळेतील ग्रुप लीडर्स यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना विठ्ठल मूर्ती प्रदान करून गौरविण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व संघभावना वृद्धिंगत झाली. तसेच स्पोर्ट्स क्रीडा दिनाच्या दिवशी आयोजित ग्रुप गेम्समध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपचाही सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने विशेष शोभा आली. कलाकारांसोबत पालकवर्ग व विद्यार्थ्यांनी ठेका धरत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
महिलांच्या मनोरंजनासाठी आयोजित ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. हा खेळ प्रसिद्ध अभिनेते श्री. विलासकुमार शिरसाठ यांनी अत्यंत उत्साहात खेळवला.
* प्रथम क्रमांक – मेघा विशाल अहिरे (मानाची पैठणी)
* द्वितीय क्रमांक – अश्विनी प्रणराज मोहिते (सेमी पैठणी)
* तृतीय क्रमांक – शुभांगी पंकज भंडारी (सेमी पैठणी)
विद्यार्थी व पालकांच्या मनोरंजनासाठी पपेट शो, कटपुतली शो तसेच पंजाबी ढोल यांचे आयोजन करण्यात आले होते. आनंद मेळाव्यात लावण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा उपस्थितांनी मनमुराद आस्वाद घेतला.
आपली संस्कृती जपणारा व लोककलेचे दर्शन घडवणारा वासुदेव हा कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी उंट सफरीची व्यवस्था, तसेच लहान मुलांसाठी पाळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
संपूर्ण शाळेची आकर्षक सजावट व रंगीबेरंगी रांगोळीमुळे कार्यक्रमस्थळ अधिकच देखणे झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, वाहनचालक बंधू व मावशी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
एकूणच हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अविस्मरणीय, आनंददायी व प्रेरणादायी अनुभव ठरला.


















