पिंपरीत भाजपाचा आनंदोत्सव
पिंपरी (दि. 15 डिसेंबर 2016) आज जाहीर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूक निकालात भारतीय जनता पार्टीने तळेगाव, लोणावळासह आळंदी नगरपालिकेत देखील यश मिळविले. हे केंद्र आणि राज्य सरकारवर जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या लोकउपयोगी निर्णयामुळे मतदार राजा भाजपावर विश्वास व्यक्त करीत आहे. भाजपाच्या विजयाची लाट आता पिंपरी चिंचवड महापालिका जिंकल्याशिवाय थांबणार नाही, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांनी केले.
आज पुणे आणि लातूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यामध्ये तळेगाव, लोणावळा आणि आळंदी नगरपालिकेत भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि औसा नगरपालिकेत देखील भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले. एकूण चौदा नगरपालिकेत 324 नगरसेवक पदांसाठी झालेल्या या निवडणूकीत भाजपाच्या 81 उमेदवारांनी विजय मिळविला. याच्या आनंदाप्रित्यर्थ पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने आज गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडून साखर वाटण्यात आली.
यावेळी शहर संघटक सरचिटणीस माऊली थोरात, शहर सरचिटणीस बाबू नायर, नगरसेवक शितल शिंदे, शहर उपाध्यक्ष मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चा अध्यक्ष रवी लांडगे, आण्णा गर्जे, रविंद्र इंगवले, सुरेश पाटील, गणेश संभेराव, दिपक नागरगोजे, योगेश सोनावणे, छाया पाटील, शोभा भराडे, वीणा सोनवलकर, तृप्ती परदेशी, राजेश आडसुळ, विकास विधाते, लखन पाटकर, संकेत वाघमारे, योगेश लंगोटे, पवन पाघवर, धरम वाघमारे, सचिन देवकुळे, नंदू तंबोरे, शुभम राऊत, योगिनी निंबाळकर, विमल आनंदतुल्ला, अनिल राऊत, राजेंद्र ढवळे आदी उपस्थित होते.