सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी
पिंपरी :- निगडीतील अमरधाम स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरील जगदगुरु संत तुकाराम महाराज शिल्पाची संरक्षक काचा नसल्याने विटंबना होत आहे. त्यामुळे सदर शिल्पास तात्काळ संरक्षक काचा बसविण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत खैरनार यांनी म्हटले आहे, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरील जगदगुरु संत तुकाराम महाराज शिल्पाच्या होत असलेल्या विटंबने बाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीनुसार शिपाची रंगरंगोटी, शिल्पाला संरक्षक काचा तसेच तेथे लाईट बसविणे अपेक्षित होते. परंतू आजतागायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,असे दिपक खैरनार यांनी म्हटले आहे.