पिंपरी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोसरीगाव, सन २०२३-२४ च्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अमोल मधुकर डोळस यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
भोसरी येथे झालेल्या या बैठकीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते सखाराम बाप्पु डोळस, पवना सहकारी बँकेचे संचालक भाऊसाहेब डोळस, अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे संचालक दिपकभाऊ डोळस, उद्योजक राजेंद्र तात्या डोळस, चंद्रकांत अण्णा डोळस, अनिल डोळस, विलास डोळस, विजय भालेराव, अनिल डोळस, संजय डोळस तसेच जयंती महोत्सव समितीचे सभासद व महासचिव किरण नाना डोळस आदी उपस्थित होते.