मुंबई: महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) द्वारे शिक्षकांच्या 30,000 रिक्त जागा भरल्या जात आहेत. एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
वर्षातून दोनदा टीएआयटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला ही भरती सोपवण्यात आली आहे.
ते म्हणाले की, या कंपन्या केंद्र सरकारसाठीही काम करतात आणि विश्वासार्ह आहेत. भरती प्रक्रिया एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षक अध्यापनासाठी उपलब्ध होतील.
(एजन्सी )






















