पिंपळनेर : प्रचिती पब्लीक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा वाढदिवस दि. १ जून रोजी येथील शासकीय रुग्णालयात फळे, फराळ वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी, शाळेचे व्यवस्थापक राहुल पाटील, प्राचार्या श्रीम. अनिता पाटील, अर्चना देसले, सरिता अहिरे, सुनिता जाधव, आश्विनी सुर्यवंशी, रिनल सोनवणे, प्रतिक्षा कोतकर, काजल राजपुत, आश्विनी पगार आदी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला आळा घालून श्री. प्रशांत पाटील यांचा वाढदिवस गोरगरिब, रुग्ण, महिला यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला जातो. यंदाही गोर-गरिब विद्यार्थ्यांना व शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णालयातील अधिकारी वर्ग व परिचारिका यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास साधणारे शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील हे विद्यार्थी दशा व बालमन ओळखून प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर ही संस्था चालवत आहेत. विद्यार्थ्यांना नव्या दिशा दाखवणे व त्यांची स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. तसेच सामाजिक सेवा व गोरगरिब यांचा चिरंतन आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो.