शिंदखेडा : संत जगनाडे महाराज यांचे जन्मगाव व समाधीस्थळ असलेले सदुंबरे (जि. पुणे) गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे. यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दीपक चौधरी यांनी दिले. चौधरी यांनी नुकताच मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
येथील तौलिक महासभा व संत जगनाडे युवा मंचतर्फे जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. विरदेल रोडवरील लक्ष्मीनारायण मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर नगरपंचायत सभागृहात मुलींनी बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावरील नाटिका सादर केली. महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. सूत्रसंचालन नयना चौधरी व पल्लवी चौधरी यांनी केले. आभार सुशील चौधरी यांनी मानले.
दगा चौधरी, दिलीप चौधरी, गारेण चौधरी, श्रीराम चौधरी, माजी पं.स. सदस्य प्रकाश चौधरी, नगरसेवक किरण चौधरी, नगरसेविका सुषमा चौधरी, तौलिक महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव सुनील चौधरी, देविदास चौधरी, प्रा. उमेश चौधरी, विजय चौधरी, मनोज चौधरी, संदीप चौधरी आदी उपस्थित होते.