चिकसे : साक्री तालुक्यातील देगाव येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांमार्फत भारतीय लष्करातून नुकतेच सेवानवृत्त झालेले जवान सूर्यकांत रामदास अहिरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सूर्यकांत अहिरे यांनी एकूण 16 वर्ष सैनिक म्हणून देशसेवा केली. यावेळी ते म्हणाले, खरी देशसेवा करायची असेल तर तरुणांनी सैन्यात भरती झाले पाहिजे. आदिवासी भिल्ल समाजाचे असलेले अहिरे यांचे दोन लहान भाऊ देखील भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत.
अहिरे कुटुंबीयांचा आदर्श ठेवत प्रत्येक घरातून एकजण सैन्यात गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच आक्काबाई बहिरम, उपसरपंच सुधीर अकलाडे, साक्री पंचायत समिती सदस्य प्रकाश अकलाडे, विनायक अकलाडे, आत्माराम देसले, रमेश वाघ, राकेश चौरे, राणीलाल चौधरी, काशिनाथ अहिरे, बन्सी ठाकरे, रामदास अहिरे, डोंगर माळीच उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार तुकाराम बहिरम यांनी मानले.