धुळे : येथील प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व पश्चीम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवून नववर्षाचे आगळेवेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले.
नववर्ष अखेरीचा जल्लोष आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईच्या उज्रेचा सकारात्मक उपयोग करुन घेत येथील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र निकम यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबविली. घाणीमुळे विविध आजार व रोगराई पसरते. त्यास प्रतिबंध घालण्याचा उत्तम उपाय म्हणजे नियमित स्वच्छता. या कामात तरुणाईच्या उर्मीचा चांगला वापर करुन घेता येईल, या उद्देशाने प्रा. निकम यांनी विद्यार्थ्यांना नववर्षाच्या स्वागतासाठी ही कल्पना सांगितली. त्यास सर्वांनी प्रतिसाद देत जिल्हाधिकारी कार्यालय व पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता मोहीम राबविली.
प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इस्टिट्युशन अंतर्गत असलेल्या निकम तंत्र निकेतन, प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी, आर. ओ. निकम कनिष्ठ महाविद्यालय व निकम पब्लिक स्कूलच्या 40 विद्यार्थ्यांच्या समूहाने हे अभियान राबविले. स्वच्छता अभियानात आवारातील कचरा, बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या यांची विल्हेवाट लावण्यात आली. प्रत्येक विभागाचे कोपरे व त्यात अडकलेला कचरा साफ करण्यात आला.
स्वच्छता अभियानासाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना हातमोजे, झाडू, पाट्या, खराटे इ. साहित्य पुरविण्यात आले. अभियानाचे नियोजन प्राचार्य प्रकल्प पाटील, प्राचार्य अल्ताफ शेख, प्रा.जितेंद्र सोनवणे, प्रा.श्रीकांत कुलकर्णी, प्रा.राहुल बागूल, प्रा.पूनम पाटील, प्रा.प्रियंका पाटील, प्रा.प्रेम देसले, प्रा.नीलेश देवरे, प्रा.भूषण पाटील, प्रा.ए.ए.अन्सारी, प्रा.चेतन पवार, प्रा.किरण पाटील, प्रा.गायत्री वाघ, प्रा.जयेश चौधरी, प्रा.अमोल विधाते, प्रा.एस.एम.अन्सारी, प्रा.राहुल ठाकूर यांनी केले.