खेतीया येथे विविध कार्यक्रम
दहिवेल : तेली समाजाचे दैवत संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन खेतीया येथे करण्यात आले होते.
गायत्री शक्तीपीठ पासून या शोभायात्रेला सुरुवात होऊन समाज मंदिरात सांगता झाली. दरम्यान गायत्री शक्तीपीठाचे उपाध्यक्ष सुपडू चौधरी यांच्यामार्फत सपत्नीक जगनाडे महाराजांच्या प्रतिमेची पूजा झाली. त्या प्रसंगी समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जगदीश चौधरी यांनी संत जगनाडे महाराजांविषयी जीवनपट सांगीतला. कार्यक्रमासाठी गोविंदा चौधरी, दिनेश चौधरी, अनिल चौधरी, नाना चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, राकेश चौधरी, राजेंद्र चौधरी, योगेश चौधरी, लक्ष्मण चौधरी यांचे सहकार्य लाभले. कांतीलाल चौधरी, विजय चौधरी, सुमित चौधरी, अमित चौधरी, तुषार चौधरी यांनी परिश्रम घेतले.