निजामपूर : साक्री तालुक्यातील खुडाणे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील शिक्षक रामचंद्र सुकदेव भलकारे यांना ओबीसी विद्यार्थी शिक्षक-पालक विकास असोसिएशन संस्थेतर्फे नाशिक विभागीय गुरूगौरव पुरस्कार पदवीधर आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील होते. आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या विशेष उपस्थितीत गुरूगौरव या नाशिक विभागीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अमळनेरच्या अँड़ ललिता पाटील अँड़ संभाजी पगारे, रामकृष्ण खलाणे, डॉ.सुशील महाजन, प्रा. एस.के. चौधरी, देवेंद्र पाटील उपस्थित होते. आ.डॉ. सुधीर तांबे म्हणाले, ज्ञानदानातून विद्यार्थ्यांच्या अंतरमनात गुणात्मक शैक्षणिक विकासाला आवश्यक असणारे पैलू पडावेत.
यासाठी झटणारा शिक्षक उद्याचा कर्तबगार समाज घडविणारा शिल्पकार आहे, असे सांगितले. यावेळी खुडाणे येथील शिक्षक रामचंद्र भलकारे यांना गुरूगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यांचे गटशिक्षणाधिकारी बी.बी.भील, शिक्षण विस्तार अधिकारी एस.ई. बागूल, व्ही.व्ही.पवार, केंद्रप्रमुख चंद्रकला निकुम, मुख्याध्यापिका कल्पना सावंत, प्राथमिक शिक्षक जिल्हा समन्वयक अध्यक्ष राजेंद्र पाटील, बापू पारधी, एकनाथ भामरे, देविदास महाले, विनोद पाटील, कैलास दाभाडे, सुभाष पगारे, कैलास ईशी, गोकूळ पाटील, रवींद्र सैंदाणे, पावबा बच्छाव, संजय धनगर, छोटू सोनवणे, योगेश होलारे, प्रकाश बच्छाव, दीपक मोरे, सुनील जाधव, विजय न्याहळदे यांनी कौतुक केले. प्रास्ताविक के.एन.माळी यांनी केले. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केल. आभार अनिल सोनवणे यांनी मानले.