निजामपूर : संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निजामपूर-जैताणे तेली समाज तसेच संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळातर्फे येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
धनाई पुनाई विधायक मंडळाचे अध्यक्ष बाळूशेठ विसपुते यांच्या हस्ते इंदिरा गांधी माध्यमिक कन्या विद्यालयात संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून खुदाबक्ष शेख, रघुवीर खारकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देवरे, विशाल मोहने, महेंद्र चौधरी, मुख्याध्यापिका श्रीमती जाधव उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल निजामपूर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय जैताणे, जि.प. प्राथमिक शाळा निजामपूर येथील मुला-मुलींना संत जगनाडे महाराज मित्र मंडळाचे महेंद्र चौधरी, भालचंद्र चौधरी, गोकूळ चौधरी, किरण चौधरी, भैय्या चौधरी, जिभाऊ चौधरी, जगन चौधरी आदी युवा कार्यकर्त्यांसह महिलांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस. महाजन यांनी केले. आभार महेंद्र चौधरी यांनी मानले.