प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे प्रभु श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये आज दि. 22 जानेवारी रोजी प्रभु श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे समन्वयक राहुल पाटिल, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या हस्ते प्रभु श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेची शोभा यात्रा काढण्यात आली.
” श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे.
एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम,
अशारघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
विद्यार्थ्यांनी सुंदर अशी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान व शबरी यांची वेशभूषा परिधान करून पालखी सोहळ्याचे लक्ष वेधले. इयत्ता ६ वी वर्गातील विद्यार्थीनीनी सुंदर असे नृत्य सादर केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे व भगवान श्री राम नामाचा जयघोष केला. शोभा यात्रेत ‘अयोध्या धाम जय श्री राम ” प्रभु श्री रामचंद्र की जय” अशा घोषणा देण्यात आल्या. या शोभायात्रेत ग्रामस्थ व विशेष महिलांचा सहभाग लाभला. महिलांनी पालखीचे पूजन केले. रांगोळी रेखाटून सर्व परिसर सुशोभित करण्यात आला. रामायणावर आधारित प्रश्न मंजुषाचा खेळ खेळण्यात आला. त्याला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. सुंदर असे फलक लेखन केले. सुंदर आशी रांगोळी रेखाटल्यात आली. विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा, राम रक्षा स्रोतचे पठन केले. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष प्रशांत भिमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजल पंडिल यांनी केले.