मुंबईत मेस्टा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांच्याहस्ते संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्यासह शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने सन्मान
साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामगीरीच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे मेस्टा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांच्या हस्ते सन 2023-24 चा उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक तुषार देवरे, वैभव सोनवणे यांनी स्विकारला.
शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांना नियोजनपूर्वक प्रशासनाबद्दल उत्कृष्ट प्राचार्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून वैभव सोनवणे यांनाही गौरविण्यात आले. यासह, कुणाल देवरे, वैशाली खैरनार, सपना देवरे, कांचन अहिरराव यांना MESTA Foundationचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य सभागृह, मुंबई येथे पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कारांमागे खऱ्या अर्थाने विद्यार्थी व शिक्षकांप्रती तळमळ असणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. शाळा प्राचार्या आणि शिक्षकांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, या पुरस्कारामुळे शिक्षकांना भविष्यात शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.