पिंपरी (दि. 11 जानेवारी 2017) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डीतील एस.बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘जागतिक आर्थिक घडामोडी संदर्भात भारतापुढील आव्हाने व संधी’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 13 व 14 जानेवारी 2017) सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विदयमाने होणा-या या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सौराष्ट्र विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. संजय भायाणी यांच्या हस्ते आणि बिझनेस स्टॅन्डर्ड लिमिटेडचे विभागीय प्रमुख सुमेध गुप्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप शनिवारी (दि. 14 जानेवारी) दुपारी 4 वाजता प्रसंगी एम.यु. महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. विजयालक्ष्मी नांबीयार, प्राचार्य डॉ. महादप्पा गोंडा, गुवाहाटी विद्यापीठाचे डॉ. गौर गोपाल निक, गोवा विद्यापीठाचे डॉ. फिलीप लॉड्रीक्स इ-मेलो, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचेडॉ. राजेंद्र बिरादार, पिंपरी डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निकम आदी व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ व्यक्ति मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. डॅनिअल पेनकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.