पिंपळनेर : येथील पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस सप्ताह साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने पोलिस ठाण्यात पथसंच होवून शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली.
शस्त्रांस्त्रांचा उपयोग कोणत्या काळात होता, तसेच प्रत्येक बंदुकीत किती गोळ्या असतात. पोलिस दलातर्फे कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी समाजात या सहस्त्रांचा वापर होता अशा वेळी विद्यार्थ्यांना शस्त्रांस्त्रांची माहिती व्हावी व त्याचे नाव काळावे व प्रत्येक शस्त्रांस्त्रांचा उपयोग काय या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती एपीआय सुनिल भाबड व पीएसआय योगेश खटकळ यांनी करुन दिली.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी शस्त्रे जवळून पाहत हातात धरुन त्याची पाहणी ही केली. यावेळी पोलिस अधिकार्यासह विद्यार्थ्यांनी गावातून पथसंचलन केले तसेच विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनात दैनंदिन कारभार कशा पध्दतीने होतो याची संपुर्ण माहिती एपीआय सुनिल भाबड यांनी दिली, पोलिस स्टेशनातील प्रत्येक विभागात कशा पध्दतीने काम चालते या संदर्भात फिर्याद व तक्रार नोंदली जाते त्याच्या माहितीचे आदानप्रदान कसे होते, हे समजवण्यात आले.
तसेच क्राईमदालन, गोपनीय कक्ष, दहशवातवा कक्ष, दुय्यम अधिकारी कक्ष, प्रभारी अधिकारी कक्ष, पुरूष व महिला जेल, मुद्देमाल कक्ष, शस्त्रगार कक्ष, महिला पोलिस कक्ष आदीची देण्यात आली. यावेळी परिसरातील राजेहस्त्रपती इंग्लीश मेडीयम स्कूल, एन.एस.पी.पाटील विद्यालय, कर्मचारी आ.मा.पाटील विद्यालय, सामोडे आश्रम शाळा आदी विद्यार्थ्यांनी सहस्त्रांची माहिती जाणून घेतली.
यावेळी गोपणीय प्रमुख राजेंद्र खैरनार, पीएसआय लोकेश पवार, क्राईम प्रमुख ललित पाटील, दहशदवाद विरोधी प्रमुख भूषण वाघ, सुनिल साळुंके, पल्लवी शिंदे, मधुकर पगारे, प्रवीण अमृतकर, सागर ठाकूर, प्रवीण सोनवणे, धनंजय मोरे, दीपक माळी, दीपक गायकवाड, शिक्षकांमध्ये जयेश खैरनार, एस.पी. नांद्रे, विशाल गांगुर्डे, अमोल अहिरे, अंकुश ठाकरे, पुरूतोत्तम बोरसे, रवींद्र देवरे आदी.