शिंदखेड्यात एटीएमची अंत्ययात्रा
शिंदखेडा येथे तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी एटीएम मशिनची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. शिंदखेडा येथे एटीएम मशिनची काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी आ.रामकृष्ण पाटील शिंदखेडा येथे एटीएम मशिनची काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी आ.रामकृष्ण पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात माजी आ.रामकृष्ण पाटील, एन.सी.पाटील, आधार पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, ज्योती पावरा, सत्यजित सिसोदे, सौ.कलावती माळी, सौ.सुनीता पाटील, देविदास कोळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धुळे : नोटबंदीच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे आज जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा निषेध करत एटीएम मशिनची अंत्ययात्रा काढण्यात आली. माजी आ.राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून नोटबंदीसंदर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. धुळ्यात आंदोलन धुळे येथे माजी आ.राजवर्धन कदमबांडे, महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, महापौर सौ.कल्पना महाले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.जयश्री अहिरराव, मनपा सभागृहनेते कमलेश देवरे, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, जि.प.सदस्य किरण पाटील, उपमहापौर उमेर अन्सारी, राष्ट्रवादी सेवादलाचे नंदू येलमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नोटबंदीमुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. अनेक एटीएम बंद आहेत. सामान्य जनतेची त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
शिरपूरला निवेदन
शिरपूर येथे तहसीलदारांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. नोटबंदीच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
साक्रीत आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदी निर्णयाचा त्रास शेतकरी व सर्वसामान्य जनतेलाच झाला असून आजही सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याने या त्रासातून दिलासा मिळावा ही मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संदिप बेडसे, प्रांतीक सदस्य सुरेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र मराठे, अमित नागरे, जि प माजी सभापती सचिन बेडसे, नगरसेवक शरद भामरे, तालुका अध्यक्ष नरेंद्र तोरवणे, साक्री शहर अध्यक्ष डॉ दिलीप चोरडिया, प स सदस्य किरण बच्छाव, राष्ट्रवादी महिला आघाडी साक्री शहरअध्यक्षा सौ उज्वला पाटील, युवती सभा शहर अध्यक्षा राजकुमारी सिंग, जि प सभापती सौ लिलाताई बेडसे, नगरसेविका स्वाती बेडसे, अपर्णा भोसले, प्रेरणा वाघ, माजी नगरसेवक जगदीश वाघ, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस नितीन बेडसे, राष्ट्रवादी युवाआघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत पवार, शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष अरुण अहिरराव, जैताणे शहर अध्यक्ष अल्ताफ कुरेशी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी संदिप बेडसे यांनी पक्षाचे विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जितेंद्र मराठे, नरेंद्र तोरवणे व शरद भामरे आदींसह महिला पदाधिकारींनीही आपले विचार मांडलेत. तहसिलदार कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.