अधिकाऱ्यांनी दिली लेखी हमी
आंदोलनाची दखल घेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रबंधक परियोजना कार्यान्वयन ईकाई, औरंगाबादचे महेश पाटील हे त्यांच्या सहकार्यांसह दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजुत काढत धुळे-चाळीसगांव रस्ता दुरुस्ती करण्यात येईल. त्यासाठी आम्हाला 15 दिवसाची मुदत दिली जावी, अशी विनंती केली.
यावर जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी लेखी हमी मागीतली. त्यावर अधिकाऱ्यांनी 15 दिवसात खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे लेखी पत्र दिले.
धुळे : धुळे-चाळीसगांव रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीकरणासाठी शिवसेनेतर्फे शिरुड चौफुली येथे दीड तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
धुळे-चाळीसगांव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन जिवीत हानी होते. काहींना अपघातामुळे कायमचे अंपगत्व आल्याने त्यांचे फार मोठे नुकसान होत होते. खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त होण्यासाठी शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला तेसच रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता.
पत्र व्यवहार करुन दोन महिन्याचा कालखंड उलटल्यानंतर देखिल प्रशासनाने दखल न घेतली नाही. त्यामुळे धुळे-चाळीसगांव रस्त्यावर शिरुड चौफुली येथे रास्ता रोको करुन चक्का जाम करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.
शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, तालुकासंघटक नितीन पाटील, उपतालुका प्रमुख भिकन राजपूत, सावता माळी, माजी जि.प.सदस्य किरण ठाकरे, विभागप्रमुख चंद्रकांत म्हस्के, गजानन पाटील, राजू माळी, हेमराज पाटील, विंचूरचे सरपंच बाळासाहेब पाटील, उपविभागप्रमुख सुधाकर पाटील, रोहिदास वाघ, भावडू माळी, दादाभाऊ माळी, माजी पं.स.सदस्य सुरेश दामू माळी, सत्यजीत पाटील, सुरेश सोनवणे, भैय्या कोळी, गोपीचंद पाटील, अनिल गवळी, अशोक गवळी, भटू गवळी, केशव माळी, गुलाब माळी, भगवान जगताप, साहेबराव माळी, भिकन मराठे, गुलाब पाटील, अभिजीत पाटील, रावण पाटील, संतोष पाटील, दगडू माळी आदी या वेळी उपस्थित होते.