प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये रंगली दोन दिवसीय तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा
१४ ते १७ वयोगटातील 200 खेळाडूंनी घेतला सहभाग
साक्री : क्रीडा व युवक अंतर्गत सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने साक्री तालुकास्तरीय पावसाळी क्रीड़ा स्पर्धा प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे घेण्यात आल्या. दि. ५ व ६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आयोजित दोन दिवसीय स्पर्धेसाठी तालुक्यातील 200 बुद्धिबळ पटुंनी सहभाग नोंदवला. यामध्ये, 130 मुले आणि 70 मुलींनी बुद्धिबळाचे डावपेच खेळले. 14 ते 17 वयोगटातील खेळाडूंसाठी पाच स्तरावर स्पर्धा पार पडली.
क्रीड़ा महासंघ तालुका अध्यक्ष संजय भामरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाल फीत कापून प्रचिती पब्लिक स्कूलच्या प्रांगणात स्पर्धेला करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, शाळेचे समन्वयक राहुल पाटील, प्रशांत साळुंखे, वैभव सोनवणे, धनंजय सोनवणे, नितीन खैरनार, अमोल अहिरे, अनिल पाटील, बि. एस. बागुल, महेश मराठे आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धा म्हणजे अपयश नव्हे तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द. हिच जिद्द उरात बाळगुण खेळाडूंनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्साह दाखवला. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले. तसेच बुध्दिबळाचे महत्त्व अश्विनी पगार यांनी प्रास्ताविकाद्वारे मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भामरे यांनी क्रीडा स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले. तसेच बुद्धिबळ या खेळा विषयीचे नियम व अटी प्रशांत साळुंखे यांनी सांगीतले. स्पर्धेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.